सलग दुसऱ्या दिवशीही एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा डाव वृद्धाच्या दगडफेकीने फसला..! पडेगावात गॅस कटरने एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न

Foto
औरंगाबाद- देवळाई भागात २५ लाखांची रोकड असलेलं अख्ख एटीएम पाळविल्याच्या घटनेला २४ तास उलटत नाहीत.  तर पाडेगाव भागात चोरट्यानी गॅस कटरच्या साह्याने एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला.  नागरिकांनी केलेल्या दगडफेकीमुळे चोरटे पळाले. अन्यथा, चोरट्यानी डाव साधला असता.  ही घटना आज पहाटे पावणे चार वाजेच्या सुमारास पाडेगाव येथील मिसबाह कॉलॉनीत घडली.

शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास बीड बायपास रस्त्यावरील देवळाई येथील एसबीआय बँकेचे २५ लाख रुपये रोकड असलेले एटीएम मशीनच चोरट्यानी पळविल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.  या घटनेला २४ तासही उलटत नाहीत तर पाडेगाव भागातिल मिसबाह कॉलोनी भागात असलेल्या एसबीआय बँकेचे एटीएम कटरच्या साह्याने फोडण्याचा प्रयत्न आज पहाटे  झाला. 

पहाटे सुमारे तीन ते  साडेतीन वाजेच्या सुमारास पाच चोरटे एका पांढऱ्या रंगाच्या तवेरा गाडीने एटीएम जवळ आले. त्यानंतर दोन जण गॅस कटरच्या साह्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न करीत होते. एक जण उजेड बाहेर जाऊ नये म्हणून पारदर्शी दरवाज्यावर  चादर धरून उभा होता  एक जण बाहेर रेकी करीत होता तर पाचवा चोरटा तवेरा वाहन सुरू करून गाडीत बसला होता.  चोरटे एटीएम फोडत असताना साहित्य खाली पडण्याचा आवाज आल्याने इमारतीचे वाचमन शेख समद अहेमद हे ७३ वर्षीय वृद्ध गॅलरीत उभे असताना त्यांनी चोरट्यानी पाहिले.  भेदरलेल्या वृद्धाने १०० नंबरवर पोलिसांना माहिती देण्यासाठी कॉल केला.  मात्र, तो कॉल घेतला गेला नाही.  त्यामुळे शेजारील काही नागरिकांना त्यांनी कॉल करून माहिती दिली. कुठलीही मदत मिळत नसल्याने वृद्धाने  धाडस करीत चोरट्यावर दगडफेक केली. प्रतिउत्तरात चोरट्यानी देखील दगडफेक केली आणि पोबारा केला.याप्रकरनी आज शेवटची माहिती हाती येई पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

चोरटे सीसीटीव्हीत कैद...
चोरट्यानी बिल्डिंग मधील सीसीटीव्हीचे वायर कापले होते. त्यांनतर त्यांनी एटीएम मधील काही वायरी तोडल्या मात्र, त्या मधील एका कॅमेरात दोन ते तीन चोरटे कैद झाले आहे. पोलीस फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहे.

अन पोलिसासमोरून गेले चोरट्यांचे  वाहन..!
शेख यांनी चोरट्यावर केलेल्या तुफान दगडफेकीनंतर चोरट्यानी पळ काढला.  मात्र, त्याच दरम्यान काही मिनिटानंतर तेथून गस्त घालणारी पोलिसांची मोबाईल व्हॅन जात होती.  त्या वाहनास शेख यांनी थांबून घडलेला प्रकार सांगितला. पाच मिनिटे अगोदर पोलीस आले असते तर चोरट्यां मुसक्या बांधल्या गेल्या असत्या.


पोलिसांनी फोन उचलला असता तर..?
जेंव्हा चोरटे गॅस कटर च्या साहय्याने एटीएम मशीन कापत  होते.त्यावेळी मी १०० नंबरवर कॉल केला होता. मात्र, तो घेतला गेला नाही.  वेळीच तो घेतला गेला असता तर सर्वच चोरटे आज गजाआड असते. मी दगडफेक केल्यानंतर ते पळून गेले व काही मिनिटानंतर  पोलीस वाहन आले.

शेख समद अहेमद, प्रत्यक्षदर्शी

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker